Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडित झाली एचआयव्ही’बाधित

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

marathinews24.com

पुणे – शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून, नात्यातील २४ वर्षीय नराधमाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. त्याच्या क्रूर कृत्यामुळे पीडित मुलीला ’एचआयव्ही रोगाची लागण झाल्याचे उघड झाल्याचे मुलीला ताप आल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची रक्त तपासणी केली असता हे सत्य उघडकीस आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पीडितेच्या आईने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सवाचे आयोजन – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा पीडित अल्पवयीन।मुलीचा दूरचा नातेवाईक आहे. त्याने २०२१ पासून पुणे आणि कर्नाटकमध्ये मुलीला गावी नेऊन अत्याचार केले. खडकी परिसरात राहणार्‍या पीडित मुलीशी आरोपीने दूरचे नाते सांगून फोनवरून जवळीक वाढवली होती. मुलगी घर सोडून निघून गेली होती, त्यामुळे खडकी पोलीस ठाण्यात तिचे अपहरणाचे प्रकरणही दाखल झाले होते. तिला शोधून काढल्यानंतर मुंढवा येथील महिला आश्रमात ठेवण्यात आले होते.

पीडित मुलीला ताप आल्याने तिला ससूनमध्ये उपचारासाठी नेले असता, रक्त तपासणीत ती ’एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचा धक्कादायक अहवाल आला. त्यानंतर मुलीने आपल्या आईला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पुढील तपास समर्थ पोलिस करत आहेत. प्रकरणातील नराधम आरोपी अद्याप अटक होणे बाकी आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या आईने खडकी पोलिसांशी संपर्क साधला असता, अत्याचाराचा गुन्हा समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजमध्ये घडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खडकी पोलिसांनी तातडीने पॉक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तो समर्थ पोलिसांकडे वर्ग केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×