Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ

कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे

marathinews24.com

पुणे – कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये एकूण १२ हजार ७१९ लाभार्थ्यांला लाभ देण्यात आला असून त्यापैकी २ हजार १८ महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यांना १४ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयाचे अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

“खरीप हंगाम २०२६-२७ साठी १४५.२० लाख हेक्टर पेरणीचे नियोजन” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजने अंतर्गत ३ हजार २७० लाभार्थ्यां पैकी ३२७, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये ६ हजार ९६ लाभार्थ्यांपैकी १ हजार २१५ आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३ हजार ३५३ लाभार्थ्यांपैकी ४७६ महिला लाभार्थ्यांना असे एकूण महिला लाभार्थी आहेत.

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (६०:४० केंद्रः राज्य) तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, विभागनिहाय पीकरचने नुसार गरजेनुरुप व मागणी प्रमाणे पूर्वतपासणी केलेली दर्जेदार कृषी औजारे अनुदानावर उपलब्ध करुन देणे, कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहीत करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहेत.

सन २०२०-२१ पासुन महाडीबीटी संकेतस्थळावर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. महिला, अनु.जाती, अनु.जमाती, अल्प व अत्यल्प भुधारक यांना ५० टक्के तर इतर लाभार्थ्यांना ४० टक्के अनुदान तसेच किसान ड्रोन खरेदीसाठी कृषि पदवीधर शेतकऱ्यांकरिता अनुदान दर ५० टक्के किंवा रु. ५ लाख व इतर शेतकऱ्यांकरिता अनुदान दर ४० टक्के किंवा ४ लाख यातील कमी असेल ती. सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या अनुदानाचा दर ४० अनुदान रक्कम कमीत कमी रु. ४ लाख व जास्तीत जास्त रू. १ लाख देण्यात येते, अशी माहिती श्री. कोचोळे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×