Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

दारू पिणयास पैसैे न दिल्याने आईचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

सिंहगड रस्ता परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली. कौशल्या पप्पू कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (वय ३०) याला अटक करण्यात आली. याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (वय ३६) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिस्तूल बाळगणारे तरुण गजाआड ; कात्रज भागात खंडणी विरोधी पथकाची कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा कांबळे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदे करत नाही. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करुन आईला त्रास देत होता. पैसे न दिल्याने त्याने आईला शिवीगाळ केली. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने आाई कौशल्या यांच्यावर चाकूने वार केले. छातीत चाकूने भोसकला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या कृष्णा याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×