Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आरोग्यासाठी सामंजस्य करार

विद्यार्थ्यांच्या आहारात बायोफोर्टिफाइड झिंक-समृद्ध गहू, लोहयुक्त धान्याचा समावेश

marathinews24.com

पुणे – आंबेगाव तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि. यांच्यामध्ये घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरीता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याकरिता नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध दामले दाम्पत्याला यशवंत-वेणू पुरस्कार तर दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव – सविस्तर बातमी

या कराराचा मुख्य उद्देश आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरीता बायोफोर्टिफाइड झिंक-समृद्ध गहू आणि लोहयुक्त बाजरीचे धान्य त्यांच्या नियमित आहारात समाविष्ट करुन त्यांचे आरोग्य व पोषण समृध्द करणे हा आहे.

कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला ९ हजार विद्यार्थ्याकरिता बायोफोटिफाइड धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार दररोज ३० ग्रॅम धान्य, सुरुवातीला दोन महिन्यांसाठी आठवड्यातून दोनदा दिले जाईल, त्यानंतर ते नियमितपणे आहारात समाविष्ट केले जाईल. १ हजार विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी आठवड्यातून तीन वेळा बायोफोर्टिफाइड-झिंक गहू आणि लोहयुक्त बाजरीपासून बनवलेले लाडू आणि कुकीज असे तयार चविष्ठ पदार्थ पुरविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये पोषणयुक्त आहाराचे महत्त्वाबाबत जागरूकता कार्यक्रम, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. न्यूट्रिशिअस अॅग्री फ्युचर इंडिया प्रा. लि.चा भागीदार, अॅग्रोझी ऑर्गेनिक्स (उरुळी कांचन, पुणे येथील) या उपक्रमांना सहकार्य केले जाणार आहे. हा करार आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य पोषण मिळावे आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×