पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षपदी महेश गुप्ता यांची नियुक्ती

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्षपदी महेश गुप्ता यांची नियुक्ती

व्यापारी वर्गाला मिळाले ठोस, निर्णायक आणि प्रभावी नेतृत्व

marathinews24.com

पुणे – भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी युवा, गतिमान आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या महेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील व्यापारी वर्गामध्ये नव्या ऊर्जा, विश्वास आणि संघटनात्मक बळाची भावना निर्माण झाली आहे.

‘हिंद-दी-चादर’ समागमात नऊ समाजांचे सामाजिक ऐक्य – सविस्तर बातमी 

या प्रसंगी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महेश गुप्ता यांनी गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वर्गाच्या प्रश्नांवर आक्रमक व परिणामकारक भूमिका घेतली आहे. शासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांमध्ये त्यांची ठोस उपस्थिती आणि प्रभावी समन्वय क्षमता ही त्यांची विशेष ओळख आहे. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवायांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, समस्यांचे केवळ निवेदन नव्हे तर प्रत्यक्ष निकाल लावण्याची कार्यपद्धती त्यांनी निर्माण केली आहे.

व्यवसाय सुलभतेसाठी (Ease of Doing Business) त्यांनी इन्कम टॅक्स, जीएसटी, परवाना प्रक्रिया, स्थानिक प्रशासनाशी संबंधित अडथळे तसेच अनावश्यक दंडात्मक कारवाई याबाबत ठोस पाठपुरावा केला आहे. बाजारपेठांमधील पायाभूत सुविधा, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था आणि व्यापारी संरक्षण या विषयांवर त्यांनी सक्रिय नेतृत्व केले आहे.

भाजपा व्यापारी आघाडी ही केवळ संघटना नसून व्यापाऱ्यांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांची लढाई लढणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल, अशी स्पष्ट भूमिका महेश गुप्ता यांनी मांडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील व्यापारी वर्ग अधिक संघटित, सशक्त आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

पुणे शहरातील व्यापाऱ्यांसाठी धोरणात्मक, निर्णयक्षम आणि परिणामकारक नेतृत्व म्हणून श्री. महेश गुप्ता यांची नियुक्ती ही अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×