Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

समाजमाध्यमांवरील चुकीच्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

marathinews24.com

मुंबई – Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्यासाठी शासनाने कोणत्याही अशासकीय व्यक्ती अथवा संस्थाना प्राधिकृत केलेले नाही. यासंदर्भात समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या चुकीच्या जाहिरातीना बळी पडू नये. तसेच अर्जदारास अर्ज भरताना काही अडचण/शंका असल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने /कार्यालयांशी किंवा 1962 या टोल फ्रि नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉस – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या नावाखाली काही कंपन्या कागदपत्रे जमा करत असल्याची बाब निर्दशनास आली आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana राज्य मंत्रिमंडळाने शासन‍ निर्णय दि. 9/3/2026 अन्वये राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना मंजूर केली आहे. सदर योजनेद्वारे ग्रामीण भागात पशुपालनाद्वारे उद्योजकता निर्माण करणे हा प्रमुख हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याना दुधाळ गायी, म्हशी , शेळया, मेंढ्या, कुक्कुट पक्षी व वराह अनुदान तत्वावर देण्यात येणार आहेत.

या योजनांची अमंलबजावणी पारदर्शकपणे होण्यासाठी व योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यास व्हावा यासाठी योजनांची अमंलबजावणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे काम अंतिम टप्यात असून लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सदर प्रणाली विकसित करताना अर्जदाराच्या दृष्टीने सुलभता यावी, यासाठी अर्जदारांशी संबंधित बरीचशी कागदपत्रे (उदा. ७/१२/ उतारा , रेशनकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इ. ) ऑनलाईन पध्दतीने परस्पर उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत.

या योजनांसाठी शासनाच्या महा-डिबीटी पोर्टलवरुन केवळ आधारकार्ड क्रमांक किवा महाआयडी क्रमांक टाकून अर्जदारास अर्ज करता येईल. त्यामुळे कोणीही विविध समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या चुकीच्या जाहिरातीना बळी पडू नये. तसेच अर्ज भरताना काही अडचण/शंका असल्यास अर्जदारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने /कार्यालयांशी किंवा 1962 या टोल फ्रि नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×