Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा महापालिकेतर्फे विशेष सन्मान

शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा महापालिकेतर्फे विशेष सन्मान

‘माँ तुझे सलाम‌’सांगीतिक कार्यक्रमाला पुणेकरांची दाद

marathinews24.com

पुणे – ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्‌’, ‘राजमाता जिजाऊ की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा, युद्धामध्ये शौर्य गाजविणाऱ्या माजी वीर सैनिकांचा सन्मान असे देशभक्तीमय वातावरण पुणेकरांनी बुधवारी ( दि. १३) अनुभवले. पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‌‘हर घर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत तसेच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य, धैर्य, लष्कर सेवेतील अतुलनीय पराक्रमाचा आविष्कार, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा तसेच समाजसेवेमध्ये ऐतिहासिक काम करणाऱ्या माजी सैनिकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात केले होते.

जागतिक शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होण्याकरिता निवड चाचणीचे आयोजन – सविस्तर बातमी 

परशुराम शिंदे म्हणाले, उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयी आपुलकी, आदर आणि प्रेम निर्माण झाले आहे. महापालिकेच्यावतीने माजी सैनिकांचा आवर्जून गौरव करण्यात आला याविषयी कृतज्ञ आहोत.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. तर राजेश कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती

सुनील बल्लाळ यांनी सांगितली. अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित बोधचिन्ह स्पर्धा, माझी वारी वेषभूषा स्पर्धा तसेच आषाढी वारी छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्यांना आणि परिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांच्या ‘माँ तुझे सलाम‌’या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संवाद अध्यक्ष सुनील महाजन यांची होती, तर सूत्रधार निकिता मोघे होत्या. केतकी महाजन-बोरकर यांनी संयोजन केले. जितेंद्र भुरुक, गणेश मोरे, अश्विनी खुरपे, आकाश सोळंकी, माधुरी भोसेकर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सादरीकरणाला पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. रशिद शेख, सुनील जाधव, बाबा खान, रोहित जाधव, सोमनाथ फाटक, सुनील साळवी यांची साथसंगत होती.

देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा ‌‘माँ तुझे सलाम‌’हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, सहआयुक्त गोविंद दांगट, राजेश कादबाने, तिमय्या जंगले, सांस्कृतिक विभाग उपायुक्त सुनील बल्लाळ, प्रशासन अधिकारी राजेश कामठे, दीपक राऊत, सुरेखा भणगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कोकाटे आदी मंचावर होते.

निवृत्त कॅप्टन परशुराम शिंदे, निवृत्त कॅप्टन बाबू जाधव, निवृत्त सुभेदार मेजर हेरंब सालेकर, निवृत्त सुभेदार मेजर विवेकानंद घाडगे, निवृत्त नायक पोपट महाजन, निवृत्त हवालदार अशोक कड, निवृत्त नायक सदाशिव पाटील, निवृत्त नायक सुखदेव भोसले, निवृत्त ऑडनरी फ्लाईट लेफ्टनंट श्यामराव चव्हाण, वीरचक्रप्राप्त निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे, हवालदार बजरंग निंबाळकर तसेच पॅराऑलिंपिकमध्ये सहभागी रफीक लतिफ खान यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले तर आभार राजेश कामटे यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×