Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Munition India CBI Case : म्युनिशन इंडियाच्या कार्यकारी संचालकासह तिघांना सीबीआय कोठडी

Munition India CBI Case

पुणे, म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीतील धाडीत २ कोटी २३ लाखांची रोकड जप्त

marathinews24.com

पुणे – Munition India CBI Case : देशाच्या संरक्षण उत्पादनाशी संबंधित संवेदनशील माहितीच्या कथित गळतीसह लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याने संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुणे मुख्यालय असलेल्या म्युनिशन इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्यासह तिघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्‍यानंतर त्‍यांना विशेष सीबीआय न्यायालतयात हजर करण्यात आले. त्‍यांना विशेष न्यायाधीश आर.आर. मेंढे यांनी 19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

डेक्कनमधील फ्लाइंग जिप्सी कॅफेत तरुणावर वार करणाऱ्याला बेड्या – सविस्तर बातमी 

ड्रोन व दारूगोळा निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कंसल आणि अनिल कुमार यांचा भाऊ बी. हर्षवर्धन यांचा समावेश आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कंत्राटाच्या अनुषंगाने लाचखोरी झाल्याचा आरोप असून, या कारवाईत विविध ठिकाणांहून तब्बल दोन कोटी २३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सीबीआयने १२ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला. (Munition India CBI Case) त्यानंतर १३ ऑक्टोबरला पुण्यासह म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीतील संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. अनिल कुमार हे एमआयएलमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना खासगी कंत्राटदार आणि पुरवठादारांशी संगनमत करून लाच स्वीकारत असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

सीबीआयच्या पथकाने पुण्यात अनिल कुमार यांच्या निवासस्थानासह संबंधित ठिकाणी झाडाझडती घेतली. या कारवाईत एक कोटी ७३ लाख रुपयांची रोकड आढळली. तसेच म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथील झाडाझडतीत आणखी ५० लाख रुपये आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. या रोकडीचा स्रोत, कंत्राटाशी असलेला संबंध, कथित लाचखोरीतील आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. आशिष कंसल हे एसएमटीपी लिमिटेड या ड्रोन तंत्रज्ञान आणि दारूगोळा निर्मितीशी संबंधित कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक आहेत. कंपनीचा एमआयएलसोबत सुमारे ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कराराच्या संदर्भात संपर्क असल्याचे तपासातून समोर आले आहे. कराराशी संबंधित व्यवहार, अधिकृत निर्णयप्रक्रिया आणि कथित आर्थिक देवाणघेवाण यांची माहिती सीबीआयकडून तपासली जात आहे. अधिक तपासासाठी तिघांच्‍याही पोलिस कोठडीची मागणी सीबीआयचे सरकारी वकील ए. डी. आरीकर यांनी केली. न्यायालयाने तिघांनाही 19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×