Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

चुलत्याचा खून, चुलतभावावर प्राणघातक हल्ला

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

चाकण पोलिसांनी पुतण्याला अटक

marathinews24.com

पिंपरी – बहुळ (ता. खेड) गावात महिलांमध्ये झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसन एका पुतण्याने आपल्या चुलत्याचा लोखंडी गज घुसवून खून केला. तसेच चुलत भावाला गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पुण्याजवळील तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

या घटनेत दत्तात्रय पानसरे (वय ६२, रा. चांदणी चौक, पानसरे वस्ती, बहुळ) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा तुकाराम दत्तात्रय पानसरे (वय ३८) गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तुकाराम यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चुलतभाऊ दशरथ गुलाब पानसरे (रा. चांदणी चौक, बहुळ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी तुकाराम पानसरे यांची पत्नी आणि दशरथ पानसरे यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.

हा वाद इतका वाढला की सणसवाडीत कंपनीत कामावर असलेल्या दशरथ याला त्याच्या पत्नीने फोन करून घरी बोलावले. घाईघाईने दुचाकीवरून घरी परतलेल्या दशरथने हातात लोखंडी गज घेतला आणि तुकाराम यांच्यावर थेट हल्ला चढवला.

जीव वाचवण्यासाठी तुकाराम यांनी डावा हात पुढे केला असता गज हातातून आरपार गेला आणि ते गंभीर जखमी झाले. हे पाहून वडील दत्तात्रय पानसरे हस्तक्षेप करण्यासाठी पुढे गेले असता दशरथ याने त्यांच्या छातीत थेट गज घुसवला. यामुळे दत्तात्रय यांचा घटनास्थळीच गंभीर जखमेमुळे मृत्यू झाला. जखमी तुकाराम आणि दत्तात्रय यांना तत्काळ चाकण येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र छातीत गज घुसल्याने दत्तात्रय यांचा मृत्यू झाला. तुकाराम यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×