वाघोली परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून करण्यात आल्याची घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धीरेंद्र पासवान (वय ३७, मूळ रा. लकुडी निसफराय,जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील कुमार (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नितेश राजेंद्र पाटील (वय ३९, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फुलगावातील हॉटेलवर पोलिसांचा छापा; ९५ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पासवान आणि आरोपी हे खासगी कंपनीकडून वाघोलीतील आव्हाळवाडी भागातील एका संस्थेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. दाेघे जण संस्थेच्या आवारातील खोलीत राहायला आहेत. आरोपी आणि पासवान यांच्यात बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री वाद झाला. मध्यरात्री आरोपीने पासवान याच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन त्याचा खून केला. गुरुवारी सकाळी पासवान हा खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.


























