Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

मित्राचा खून केला अन पळून जाण्याचा डाव फसला

मित्राचा खून केला अन पळून जाण्याचा डाव फसला

संगमनेरमधील खून्याला बंडगार्डन पोलिसांकडून अटक

marathinews24.com

पुणे – मित्राचा खून केला अन पळून जाण्याचा डाव फसला – भांडणाच्या रागातून मित्राच्या छातीत लोखंडी रॉड खुपसून त्याच्या कुटूंबियाला अपघात झाल्याचे भासवून पोलिसांनी दिशाभूल करणार्‍या खून्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. खूनाची ही घटना ९ ऑगस्टला संगमनेरमधील आश्वीत घडली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आसिफ सलीम शेख (वय २८ रा. आश्वीबुद्रूक ता. संगमनेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मतीन शेख वय २४ रा. आश्वीबुद्रूक असे खून झालेल्याचे नाव आहे.

कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराची आत्महत्या – सविस्तर बातमी 

आरोपी आसिफ आणि मतीन शेख आश्वीबुद्रूक गावातील असून, फॅब्रीकेशनची कामे करतात. ९ ऑगस्टला त्यांच्या वाद झाल्यानंतर आसिफने दोन साथीदारांच्या मदतीने मतीनच्या छातीत लोखंडी रॉड खुपसून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने मतीनच्या कुटूंबियाला दुचाकीवरून प्रवास करीत असताना अपघात झाल्यामुळे तो जखमी झाल्याचे सांगितले. त्यानंतर आसिफनेच रूग्णवाहिकेचा खर्च देउन मतीनला पिंपरी-चिंचवडमधील रूग्णालयात दाखल केले होते. पुढील उपचारासाठी तेथून त्याला ससून रूग्णालयात दाखल केले होते. गुन्हा पचविण्यसाठी आरोपी सतत मतीनच्या जवळ होता. दरम्यान, तो बाहेर गेल्यानंतर मतीनने आपल्यावर आसिफनेच हल्ला केल्याची माहिती आईला दिली.

उपचारादरम्यान मतीनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान महिलेने पोलिसांनी हल्लेखोर आसिफची असल्याचे बंडगार्डन पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक रंगराव पवार, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. त्यावेळी एकजण पोलिसांना पाहताच घाईने पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. आसिफ शेख असे नाव सांगत, खुनाची कबुली दिली आहे. त्याला आश्वी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी अतुलकुमार नवगीरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदिप शितोळे, सारस साळवी, अमित सस्ते, मनोज भोकरे यांनी केली.

भांडणातून मित्रावर खूनी हल्ला केल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला आरोपीनेच रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्याने गाडीवरून पडल्याचे सांगत संबंधिताच्या कुटूंबियासह पोलिसांची दिशाभूल केली होती. पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला अटक केली आहे. स्वप्नील लोहार, पोलीस उपनिरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×