Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Nana Patekar Death : झंझावाती अभिनेता आणि संवेदनशील समाजसेवक हरपले- डॉ. नीलम गोऱ्हे

Nana Patekar Death

नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला शोक

marathinews24.com

पुणे – Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यात अग्रणी असलेले नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीची आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

नाना पाटेकर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आणि सामाजिक जीवनात आपल्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला स्वतंत्र ओळख दिली. पडद्यावर विविध स्वभावांची पात्रे प्रभावीपणे रंगवणारे नाना प्रत्यक्ष आयुष्यात सडेतोड, संवेदनशील आणि माणुसकी जपणारे होते, (Nana Patekar Death) असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. नानांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, “माझी त्यांच्याशी अनेकदा भेट झाली होती. आमचे नेते एकनाथजी शिंदे त्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी आवर्जून जात असत. गेल्या वर्षीही यानिमित्ताने आमची भेट झाली होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि संवादातील आपुलकी कायम स्मरणात राहील.”

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही नाना आवडते कलाकार होते. बाळासाहेब त्यांच्या घरी गणेशोत्सवात आवर्जून जात असत. पुढील काळात पुण्यात वास्तव्य करतानाही नानांनी सर्वसामान्यांशी असलेली नाळ जपली, असे त्यांनी नमूद केले. वनीकरण, ग्रामीण विकास आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याच्या कामात नानांनी मोलाचे योगदान दिले. सामाजिक प्रश्नांवरील त्यांची भूमिका ठाम असे. मनाला पटेल तसे जगणे, अन्यायाला थेट भिडणे आणि अडचणीतील माणसाच्या मदतीला उभे राहणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये कायम स्मरणात राहतील, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ती, पुणेकर आणि विधान परिषद सदस्या या नात्याने नानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या व चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×