Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

महादेव मुंडें हत्या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट पूर्ण

महादेव मुंडें हत्या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट पूर्ण

५ दिवसात येणार अहवाल, अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष

marathinews24.com

बीड – जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निघृण हत्या प्रकरणाला दोन वर्षे उलटली आहेत. अद्याप याप्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाटच आहे. मात्र, महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे. एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांनी याप्रकरणात कारवाईचा फास चांगलाच आवळला आहे. याप्रकरणात ५ जणांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग करण्यात आली आहे. पाच पैकी दोघांची काल नार्को टेस्ट करण्यात आलेली आहे. याचा अहवाल चार ते पाच दिवसात येणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

पुण्यातील दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव – सविस्तर बातमी 

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. घटना घडून जवळपास दोन वर्ष झाले तरी याप्रकरणाचा उलगडा झालेला नाही, या प्रकरणाचा छडा लागत नसल्यामुळेच याप्रकरणी एसआयटी नेमून हे प्रकरण कर्तव्यदक्ष अधिकारी आयपीएस पंकज कुमावत यांच्या हातात देण्यात आलेले आहे. त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक संतोष साबळे हेही या पथकात अत्यंत धडाडीने कर्तव्य बजावत आहेत. हे प्रकरण उजेडात आणण्यासाठी आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्त्वात एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यानुसार मागच्या एक महिण्यांपुर्वी मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत यापुर्वी तिघांची नार्को टेस्ट करण्यात आलेली आहे. या तिघांचा रिर्पोट निगेटिव्ह आलेला आहे. तर मागच्या दोन दिवसांपुर्वी एकाची ब्रेन मॅपिंग तर काल दि. १८ फेब्रुवारी रोजी दोघांची नार्को टेस्ट करण्यात आली आहे. याचा अहवाल येत्या चार ते पाच दिवसात येणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×