राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ सप्टेंबरला आयोजन

अधिकाधिक पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र

अधिकाधिक पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र

marathinews24.com

पुणे – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपआपसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवार १३ सप्टेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन केले जाणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.

बीएस एज्युकेशन संस्थेच्या तक्रारींची चौकशी करुन अहवाल सादर करा -उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम – सविस्तर बातमी  

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची (चेक बाउन्स) प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच बँक, वीज कंपनीची दाखल पूर्व प्रकरणे आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत.

आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यासाठी नागरिकांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समितीला संपर्क साधावा. लोक न्यायालयामध्ये प्रकरणे ठेवण्याकरिता पक्षकार त्यांच्या वकिलांचीदेखील मदत देखील घेऊ शकतात.

लोक न्यायालयामध्ये प्रकरण मिटल्यास न्यायालयीन शुल्क नियमाप्रमाणे परत मिळू शकते. प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. लोक न्यायालयाच्या निकालावर अपील करता येत नाही. परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपआपसात कटूता कमी होण्यास मदत होऊन वेळ व पैसा दोघांचीही बचत होते, अशी माहिती श्रीमती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

लोकअदालतीमध्ये मालमत्ता करावर सुट – सविस्तर बातमी 

दाखलपूर्व प्रकरणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या प्रकरणामध्ये नागरिकांनी संपूर्ण रक्कम एकरकमी ऑनलाईन पद्धतीने भरल्यास सन २०२५-२६ च्या मालमत्ता करातील सामान्य कराच्या रक्कमेत ४ टक्के सुट देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याकरिता सर्वे क्र.२८, संजय काळे सभागृह, दुसरा मजला, एपीएफ कार्यालयाजवळ, आकुर्डी येथे संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाच्यावतीने करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×