Breking News
तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात धावत्या कारमध्ये वकिल महिलेवर अत्याचारऑनलाईन औषध विक्रीविरोधात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद तडीपार गुंड टोळीची लोणी काळभोरमध्ये पुन्हा दहशतपुणे विमानतळावरून पळण्याच्या डाव फसलागटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉलरिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला; जुन्या वादातून मारहाणपुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनांनी खळबळविशेष वृत्त – साथी पोर्टल: बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊलदुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुण्यातील वाहतूककोंडीवर नव्या तंत्रज्ञानाचा उतारा

पुण्यातील वाहतूककोंडीवर नव्या तंत्रज्ञानाचा उतारा

सर्वच कर्मचारी-अधिकारीही होणार प्रशिक्षित, नवीन कार्यालय प्रगतीपथावर

marathinews24.com

पुणे – शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आता लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार सर्वच कर्मचारी-अधिकार्‍यांना आभासी प्रकल्पाद्वारे प्रशिक्षण देउन सॉफ्ट स्कीलचे धडे दिले जाणार आहेत. त्यानुसार नागरिकांसोबत सुसंवाद, सौजन्यता, विनयता आणि नम्रतेने बोलून पोलिसांची प्रतिमाही सुधारण्यास भर दिला जाणार आहे. देशपातळीवर नावलौकिकास येईल असे मध्यवर्ती कार्यालय येरवड्यात सुरू होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

फातिमानगर चौकातील वाहतूक बदलांबाबत नागरिकांचे आंदोलन – सविस्तर बातमी 

वाढती वाहनसंख्या, अरूंद रस्ते, अतिक्रमणामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे रूपडे पालटण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार येरवड्यात कार्यालय उभारले जाणार असून, त्याद्वारे आभासी प्रकल्पातून प्रत्येक कर्मचारी-अधिकार्‍यांना धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे सुसंवाद वाढीस मदत होणार असून, तंत्रज्ञानाच्या आधारावर वाहतूकीचाही वेग वाढवण्यास प्राधान्याने काम केले जाणार आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी वाहतूक विभागातील काही कर्मचार्‍यांना सौजन्यशिलचे प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे त्यांच्यात सौजन्यता, विनयता, स्पष्टता, नम्रतेमुळे अनेक वाहतूक अमलदारांच्या वागणूकीत कमालीचा बदल घडून आला होता.

पोलीस दलाची प्रतिमा वाहतूक अमलदारांवर आधारित असते. त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकांना मिळणारी वागणूक पोलिसांसह खात्याच्या भूमिकेबद्दल स्पष्टता निर्माण करते. दरम्यान, पुण्यासारख्या मेट्रो शहरात आजवर कधीही वाहतूक पोलिसांना सॉफ्ट स्कीलचे धडे मिळाले नव्हते. प्रायोजिक तत्वावरील संबंधित प्रशिक्षणाद्वारे फायदा झाला आहे. त्यानंतर आता प्रत्येक वाहतूक कर्मचारी-अधिकार्‍यांनाही सौजन्यशीलतेचे धडे देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भविष्यात चौका-चौकात वाहन चालकांसोबत कर्मचारी-अधिकार्‍यासोबत होणारी हुज्जत, वादविवाद थांबण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत वाहतूक नियमनावर भर दिला जाणार आहे. सीसीटीव्हीद्वारे वाहतूक मॉनिटरिंग करीत नागरिकांची कोंडीतून सुटका करण्यासाठी भर देण्यात आला आहे.

सौजन्यशीलतेचे १८ सत्रे ठरली होती फायदेशीर

वाहतूक विभागाीत कर्मचारी-अधिकार्‍यांना काही महिन्यांपुर्वी १८ सत्रात सॉफ्ट स्कीलचे धड दिले होते. प्रशिक्षणादरम्यान नागरिकांसोबत सौजन्याने कसे वागावे, वाहन कायदा, नियमांची माहितीबाबत लोकांना समजावून सांगणे. अपघातप्रसंगी घ्यावयाची काळजी, इ-चलान मशीनचा वापर करण्याची पद्धत, ग्रीन कॉरीडोरवेळी आपली जबाबदारी, व्हीआयपी, व्हीव्हीआयपी दौर्‍यात अमलदार ते अधिकारी यांची भूमिका, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, नीटनेटका पोशाख, प्रभावी सुसंवादावर भर दिला होता.

शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात. अशाच पद्धतीने आता नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सर्वच कर्मचारी अधिकार्‍यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यासाठी येरवड्यात संबंधित मध्यवर्ती कार्यालय उभारले जाणार असून, लवकरच शुभारंभ केला जाणार आहे. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×