Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

पुण्यात ३ महिन्यातच नवविवाहितेने केली आत्महत्या

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सासऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

marathinews24.com

पुणे – लग्नानंतर तीन महिन्यानंतरच सासऱ्या होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर परिसरात घडला आहे. गेल्याच वर्षात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर अशाच प्रकारे घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे.

मोटारीचे सुटे भाग विक्री करणाऱ्या दुकानात चोरी – सविस्तर बातमी

पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१) उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२), रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार प्राध्यापक असुन, त्यांची मुलगी गंगाचे तेजससोबत लग्न झाले होते. तेजसचे अमेरिकेत उच्च शिक्षण झाले असून तो पुण्यात आय टी इंजिनिअर आहे. गंगा ही सुंदर तसेच उच्चशिक्षित असून आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे. तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला लग्नात काही नको, असे बोलून साखरपुड्याची तारीख ठरवली.जून २०२५ मध्ये साखरपुडा झाला. वडिलांनी आर्थिक परिस्थितीनुसार मानपान केला. मात्र, तेजशची आईने पाहुण्यांमध्ये आमची इज्जत काढून असला भिकारी फालतु आहेर आणला आहे का. आम्ही तुम्हाला भिकारी दिसत आहोत का, आमचे कुटुंब हे प्रतिष्ठित असून आमचे पाहुणे हे उच्च वर्गातील असून त्यांच्या समोर तुम्ही असला आहेर आणला का, असे म्हणत तक्रारदारांच्या कुटूंबाचा अपमान केला. १३ नोव्हेबर २०२५ रोजी विवाह झाला.

पण, तिथेही मंगल कार्यालय पसंत पडले नाही. पुन्हा त्यांचा अपमान करण्यात आला. पाहुण्यांना कोणतीही देशी विदेशी दारु, वाईनची सोय नाही, असल्या फालतु ठिकाणी आम्ही राहु शकत नाही, असे बोलून अपमान केला. तेजस केवळ चांगल्या कंपनीची अंडरवियर व बनियन आणले नाही, म्हणून लग्नामध्ये मुहर्तावर आला नाही. लग्नानंतर आठवड्याभराने धार्मिक विधीसाठी मुलगी व जावई कलबुर्गीला आले. तेव्हा गंगाने तिला घालून पाडुन बोलतात, तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला आमच्या मनासारखा हुंडा दिला नाही़ तसेच आमच्या मनासारखे लग्न केले नाही. आता तुझ्या माहेरुन २१ तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी करत आहे, अशी माहिती वडिलांना दिली. या सर्वानंतर देखील कुटूंबाने मुलीची समजूत काढून तिला परत सासरी पाठविले. नंतर सोलापूरमध्ये लग्नाला ५ फेब्रुवारी रोजी गंगा तिच्या वडिलांना भेटली. तेव्हा तिने आपल्याला हुंड्यावरुन त्रास देत असल्याचे सांगितले. त्यांनी आम्ही पुढील महिन्यात येऊन भेटतो,असे सांगितले. पण, त्यानंतर भेटायला यायची वेळ आली नाही.

अन् आयुष्य संपवले

सतत होणाऱ्या त्रासाला कंटालून गंगाने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आपले जीवन संपविले. हे समजल्यानंतर तिची मोठी बहिण सुमा हिचा बांध फुटला. गंगा हिने तिची मैत्रीण सौम्या हिला फोनवर आपल्याला होणार्‍या त्रासाची माहिती दिली होती. दरम्यान, गंगा हिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आता त्यांनी तक्रार दिली आहे सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×