Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

टीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षक

टीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षक

नसरापूर हत्याकांड प्रकरण

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर नराधम भीमराव कांबळे याने अत्याचार केल्यानंतर तिचा खून केला होता. या घटनेचा तपास ग्रामीण पोलिसांनी अहोरात्र केला. टीमवर्कमुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानांचे चार्जशीट न्यायालयात दाखल केले. घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी महामार्ग अडवून राग व्यक्त केला. आरोपीला ताब्यात देण्याचा तगादा लावला होता. मात्र, आमच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकरण हाताळले असून, चार्जशीट आणि वकिलांच्या चांगल्या युक्तीवादामुळे आरोपीला निश्चीत शिक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अ‍ॅड. अजय मिसर, पोलीस निरीक्षक विजयमाला पवार उपस्थित होत्या.

लाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकी – सविस्तर बातमी 

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल म्हणाले, अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून नराधमाने तिच्यावर अत्याचार करीत खून केला. ही घटना १ मे रोजी घडली होती. तेव्हापासून लोकांमध्ये प्रचंड राग होता. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करीत महामार्ग अडवून निषेध केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या. शासनाच्या आदेशानुसार एआयटी स्थापित केल्यानंतर टीममधील १५ अधिकारी-कर्मचार्‍यांनी कामाला गती दिली.सीसीटीव्ही विश्लेषण, सायबर एक्सपर्ट, जाब-जबाबाचे काम वेगाने केले. मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शखाली १५ दिवसांत चार्जशीट दाखल होण्यासाठी टीमने अहोरात्र काम केले.

३ अल्पवयीनांचा जबाब ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंचनामा

गुन्ह्यातील आरोपीला तीन अल्पवयीन मुलांनी पत्र्याच्या शेडमध्ये पाहिले होते. त्यांना त्याने दगड भिरकावून पळवून लावले होते. संबंधित मुलांना पोलिसांना जबाब दिला. तसेच आरोपीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्याला सातत्याने घटनास्थळी पंचनाम्यासाठी घेउन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे एकवेळी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंचनामा केला. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे अडचण होती. मात्र, आमच्या विविध टीमने १५ दिवस मेहनतीने काम करीत १२०० पानांचे चार्जशीट तयार केले. टीमसह सरकारी वकिलांचेही पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी कौतुक केले.

मुलीच्या शरीरावर १८ जखमा, ३९ मिनीटे अत्याचार-अ‍ॅड. अजय मिसर

अल्पवयीन मुलीला गाठीशेव देण्यासह गाईचे वासरू दाखवण्याच्या आमिषाने नराधमाने १ मे रोजी तिला गोठ्यात नेले. दुपारी ३ वाजून १२ मिनीटांनी त्याने मुलीवर अत्याचाराला सुरूवात केली. ३ वाजून ५१ मिनीटांनी तो शेडबाहेर येताना दिसून आला. त्याने ३९ मिनीटे मुलीवर सतत अत्याचार केल्यामुळे पीडितेच्या अंगावर १८ जखमा असल्याचे ससूनच्या अहवालात नमूद आहे. त्यानंतर त्याने तिचा जीव घेतला, अशी माहिती सरकारी वकिल अ‍ॅड. अजय मिसर यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, आरोपीने यापुर्वी दोन महिलांसह १८ वर्षीय मुलगी, जनावरावर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने चार वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×