Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कुख्यात गुंड बंडू आंदेकरकडून उमेदवारी अर्ज दाखल

कुख्यात गुंड बंडू आंदेकरकडून उमेदवारी अर्ज दाखल

नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘आंदेकरांना मत, विकासाला मत’ आंदेकरची घोषणाबाजी

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड आणि आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सून सोनाली वनराज आंदेकर यांनी शनिवारी (दि.२७) पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी बंडू आंदेकरने घोषणाबाजी केली. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘आंदेकरांना मत, विकासाला मत’ अशी घोषणाबाजी बंडू आंदेकरने केली.

धक्कादायक…मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून केला खून – सविस्तर बातमी 

आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सून सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालायने सशर्त परवानगी दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नयेत, असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले होते. त्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी पोलीस बंदोबस्तात शनिवारी दुपारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी आंदेकरने घोषणाबाजी केली.

नाना पेठेतील टोळीयुद्ध, वर्चस्वाच्या वादातून गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयूष कोमकर याचा नाना पेठेत खून केला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्यावतीने ॲड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केला होता.

‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे’, असे नमूद करुन विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास शुक्रवारी परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक ठिकाणी भाषण करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. नाना पेठेतील जामिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी बंडू आंदेकरला धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन समर्थ पाेलिसांनी नुकतीच अटक केली होती. याप्रकरणी आंदेकरला न्यायालययाने पोलीस कोठडी सुनावली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×