धक्कादायक…मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून केला खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

खून केल्यानंतर पती पोलीस चौकीत हजर

marathinews24.com

पुणे – मुल होत नसल्याने पतीने पत्नीचा गळा आवाळून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील भेकराईनगर परिसरात घडली. खून केल्यानंतर पती पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. याप्रकरणी फुरसुंगी पाेलिसांनी पतीला अटक केली. प्रियांका आकाश दोडके (वय २७, रा. गुरुदत्त काॅलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आकाश विष्णू दोडके (वय ३५) याला अटक करण्यात आली. प्रियांका यांचा भाऊ सागर रामदास अडागळे (वय ३५, रा. नानगाव, ता. दौंड) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भीमथडी’ जत्रेतील स्टाॅलमधून ५५ हजारांची रोकड लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश आणि प्रियांका यांचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. आकाश हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. आकाशचे आई-वडील, भाऊ सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. विवाहानंतर प्रियांकाला मुल होत नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. गेल्या काही दिवसांपासून तो प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने प्रियांकाशी वाद घालून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी (२६ डिसेंबर) रात्री प्रियांका आणि आकाश यांच्यात पुन्हा वाद झाला. त्याने प्रियांकाला मारहाण करुन गळा आवळून खून केला. ती बेशुद्ध पडल्यानंतर तो पोलीस चौकीत गेला. त्यानंतर त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच प्रियांका मरण पावल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. पत्नीचा खून केल्याप्रकरणी आकाशला पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×