Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे बजवावी-नोडल अधिकारी उत्तम दिघे

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे बजवावी-नोडल अधिकारी उत्तम दिघे

बारामती विधानसभा पोटनिवडणूक 2026

marathinews24.com

बारामती – विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. निवडणूकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश नवीन प्रशासकीय भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने, सर्व विभागाचे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांचा पुणे विभागीय आढावा – सविस्तर बातमी 

उत्तम दिघे म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहिताची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याबाबत दक्षता घ्यावी. नियंत्रण कक्षाची सेवा २४ तास चालू सुरु आहेच, तथापि भ्रमणध्वनीद्वारे येणाऱ्या तक्रारींची काळजीपूर्वक नोंद घेवून त्या निकाली काढाव्यात. सि-व्हिजिल ॲपमध्ये तक्रार आल्यास १०० मिनिटाच्या आत तक्रारीबाबत कार्यवाही करावी.

राजकीय पक्षांना फलक लावणे, सभा घेणे, रॅलीचे आयोजन याबाबतच्या सर्व परवानग्या एक खिडकी कक्षात देण्यात याव्यात. त्यापूर्वी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून परवानगी द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. परिवहन विभागाने वाहनांची तपासणी करावी, वाहनांवरील बॅनरच्या मजकुरामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

एसएसटी, एफएसटी, नियंत्रण कक्ष, एक खिडकी कक्ष इत्यादी विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या आणि कामकाजाबद्दल विशेष सूचना दिल्या. मतदान करतांना मतदारांना अडथळा निर्माण होणार नाही, यादृष्टीने नियोजन मतदान केंद्रावर नियोजन करावे.क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या मतदान केंद्राची पाहणी करून तेथील फर्निचर, रॅम, वीज, पिण्याचे पाणी, शौचालयाच्या सोई-सुविधा असल्याची खात्री करून घ्यावी. मतदान केंद्र आणि परिसरात स्वच्छता ठेवावे अशा सूचना दिघे यांनी दिल्या. बैठकीत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाविषयी माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×