Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन लुटीचा सपाटा सुरूच

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

विविध आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध आमिष दाखवून ऑनलाईन लूट केली जात आहे. अशा अनेक घटनेत तब्बल लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रामुख्याने शेअर मार्कटचे मार्गदर्शन घेणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी संबंधिताचा विश्वास संपादित करून त्याला तब्बल १६ लाख ५२ हजार रूपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. ही घटना ५ फेबु्रवारी ते २९ मार्च २०२६ कालावधीत केशवनगर, मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बसप्रवासात उलटीचा केला बहाणा, चोरट्या महिलेला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंढव्यातील केशवनगरात राहायला असून, ५ फेबु्रवारीला सायबर चोरट्याने संपर्क साधला होता. त्यांना शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन केले होते. विश्वास संपादित झाल्यानंतर सायबर चोरट्याने संबंधित तक्रारदाराला गुंतवणूकीस भाग पाडले. सव्वा महिन्यांत तब्बल १६ लाख ५२ हजार रूपयांची गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.

बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी, जेष्ठाला १५ लाखांचा गंडा

बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला तब्बल १५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २४ ते २६ मार्च २०२६ कालावधीत वडगाव शेरीत घडली आहे. याप्रकरणी ८२ वर्षीय जेष्ठाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक हे वडगाव शेरीत राहायला असून, २४ मार्चला सायबर चोरट्याने संपर्क साधला होता. बँकेतील कर्मचारी असल्याची बतावणी करीत विश्वास संपादित केला. विश्वास संपादित झाल्यानंतर सायबर चोरट्याने संबंधित जेष्ठ नागरिक तक्रारदाराकडून १५ लाख रूपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करीत आहेत.

शेअर ट्रेडींग गुंतवणूक पडली ३५ लाखांना

शेअर ट्रेडींग कंपनीचे एजंट असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी एका तरूणाला तब्बल ३५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ७ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर २०२५ कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीत राहायला असून, ७ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्याठिकाणी संबंधिताने शेअर ट्रेडींग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून, तरूणाला गुंतवणूकीला भाग पाडले. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने ३५ लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×