Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात ऑपरेशन मुस्कान जोरात, मुलींसह बालकांचा शोध

पुण्यात ऑपरेशन मुस्कान जोरात, मुलींसह बालकांचा शोध

गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात हरविलेल्या तसेच अपहरीत मुले, बालकांसह महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत असलेले ऑपरेशन मुस्कान जोरात सुरू आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांकडून बेपत्ता ३७ मुलीRसह बालकांचा शोध घेतला आहे. ही मोहीम राबवून तपासाला गती देण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाला ऑपरेशन मुस्कान मोहिम राबविण्यात येत आहे.

मैत्रिणीला फोन केल्याचा वाद – तरुणावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी 

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पुणे शहरात मागील दिवसांत हरविलेले व पळविलेले बालके, महीला- मुलींच्या शोधासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. पोलीस ठाणे स्तरावर मुस्कान पथकाची नियुक्ती करून बेपत्ता महिला-मुलींचा शोध घेतला आहे. हरविलेले, पळविलेले बालके व महीला मिळुन येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत पुणे शहरातील विविध भागातून ३७ मुलींसह बालकांचा शोध घेण्यास पथकाला यश आले आहे. स्थानिक नागरिक, माहितीदार लोक, दुकानदार, छोटे मोठे व्यावसायिकांकडून माहिती गोळा करून शोध मोहिमेसाठी मदत घेण्यात आली.

असे राबविले जातेय ऑपरेशन मुस्कान

शहरातून हरविलेले आणि पळविलेले बालके व महीलांबाबतची माहितीचा डेटा एकत्रित केला. त्यानुसार गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्यात मुस्कान पथकाकडून शोधमोहिम राबवली. त्यामध्ये स्थानिक दुकानदार, नागरिक, कुटूंबियाची मदत घेउन ऑपरेशन मुस्कानला गती दिली आहे.

शहरात ऑपरेशन मुस्कान मोहिम राबवून बेपत्ता व हरविलेल्या महिला, मुली, बालकांचा शोध घेतला जात आहे. संबंधिताना शोधून काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येत आहे.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×