Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

सोयीच्या प्रभाग रचनेस विरोध- राहुल डंबाळे

सोयीच्या प्रभाग रचनेस विरोध- राहुल डंबाळे

प्रभाग रचना रद्द करण्याची निवडणुक आयोगाकडे मागणी

marathinews24.com

पुणे – महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने 41 प्रभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. सदर रचना करत असताना केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे पूर्णता दुर्लक्ष करून केवळ भाजपाच्या विद्यमान उमेदवारांना सोईची ठरणारी प्रभाग रचना केल्याने ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यावतीने पक्ष अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

बाप्पाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती – सविस्तर बातमी 

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये नैसर्गिक नदी, नाले , राष्ट्रीय महामार्ग ,राज्य महामार्ग यांचा हद्द निश्चित करताना विचार केला जावा, अशा स्पष्ट सूचना असताना सुद्धा त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तसेच सध्या निर्माण केलेल्या रचनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाशी संबंधित आरक्षण व उमेदवारांवर विपरीत परिणाम करणारी रचना केल्याचे जाणवत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षणा व्यतिरिक्त निवडून येणारे प्रमाण घटणार असल्याने त्याबाबत देखील नाराजगी या पत्रात व्यक्त केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेस तात्काळ स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. प्रभाग रचना काही असली तरी सध्या राज्य सरकारचा कारभार व मागील पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेले निर्णय यामुळे शहराची प्रचंड हानी झाली असून त्याचा फटका सत्ताधारी भाजपाला बसण्याची शक्यता गृहीत धरूनच बेकायदेशीर हस्तक्षेप करून सोयीची प्रभाग रचना केल्याची भावना समस्त भाजप विरोधी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना ही सध्या केंद्रामध्ये व देशभरामध्ये सुरू असलेल्या मतचोरी प्रकरणाशी साधर्म्य साधत मतदार चोरीचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास येत असलेने या विरुद्ध व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सोशॅलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यावेळी जाहीर केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×