पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन

१० वी ते पदव्युत्तर व आयटीआय धारकांसाठी रोजगाराच्या सुवर्णसंधी

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत भोर, पुरंदर, मुळशी व वाघोली येथे मंगळवार, १७ फेब्रवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

सरदार कान्होजी जेधे शासकीय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे आयोजन करण्यात येणार आहे. निटॅब इंडिया प्रा.लि. डेलवल प्लो कंट्रोल्स प्रा.लि, प्रसाद इंटरप्राईजेस, नटेक टेक्नोलॉजी फांउडेशन, यशस्वी कडमी फॉर स्किलींग, प्रयोग इलेक्ट्रिकल्स प्रा.लि. व यझाकी इंडिया प्रा.लि., बजाज टो लि. या कंपन्यातील एकूण ६७० रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था, पुरंदर येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिका इंडिया प्रा.लि,  यशस्वी कडमी फॉर स्किलींग, जेएस सायाकी लि, देवकी मोटर्स एलएलपी, फोर्ट जाधवगड, यझाकी इंडिया प्रा.लि. बजाज टो लि. या कंपन्यातील एकुण ६४५ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

सिम्बॉयसिस सेंटर फॉर ट्रेनिग इन डव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलोजिस, सिम्बॉयसिस कम्युनिटी कॉलेज, गट नं. १०१९ पौड रोड, मु.पो. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये हिंदुस्तान कोका कोला बेवरेज प्रा.लि., वॉस ऑटोमोटिव्ह इंडिया, होर पेंकिग सिस्टिम प्रा.लि., वल्कन टेक्नोलॉजिस प्रा.लि., पुसळकर सुरक्षा कंम्पोनंटस, यशस्वी केडमी फॉर स्किलींग, स्कॅटो इंडिया प्रा.लि, महाले आनंद फिल्टर सिस्टीम, ब्रिनटन्स कारपेंटस एशिया प्रा.लि., जिझल इंडिया प्रा.लि., यझाकी इंडिया प्रा.लि. बजाज टो लि. या कंपन्यातील एकुण ७७८ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली, पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कॉन्सेंट्रीक पंप्स पुणे प्रा.लि., दर्शना इंडस्ट्रीज प्रा.लि, वॅलीओ इंडिया प्रा.लि., सिलीकंट प्रा.लि., जीकेएन ड्राईव्ह लाईन इंडिया लि. यशस्वी केडमी फॉर स्किलीग, यझाकी इंडिया प्रा.लि. बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकुण ८६५ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

या रिक्तपदांकरिता किमान १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविका, बीई अशा विविध पात्रताधारक उमेदवारांकरिता असून जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याच्या उपस्थित राहावे. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांकरिता नोकरीइच्छूक उमेदवारांनी मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वा. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना उमेदवारांनी सोबत सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पारपत्र आकाराचे छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात,

अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्तपदांना शैक्षणिक अहर्तानुसार अर्ज करावे. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे या कार्यालयाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×