Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

कीड व्यवस्थापनावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन

कीड व्यवस्थापनावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन

‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’अंतर्गत सुरु असलेल्या विशेष डिजिटल शेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शेती शाळेत ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती – सविस्तर बातमी 

शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब महत्त्वाचा ठरत आहे. पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे, तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपायांद्वारे कीड नियंत्रण कसे साधता येईल, यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत आणि मृदास्वास्थ्य जपण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

मालिकेतील पहिल्या दोन डिजिटल शेतीशाळांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत करणे, आंतरपीक पद्धती, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात ८५ हजारहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. ८ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या सत्रात जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादनावर भर देत बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. चौथी शेतीशाळा २२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्रावर होणार आहे.

या सत्रांमध्ये कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ मिळणारी उत्तरे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी मांडलेले प्रत्यक्ष अनुभव यामुळे संवादात्मक व उपयुक्त अशी शिकण्याची प्रभावी प्रक्रिया घडताना दिसून आली आहे.

सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आणि पानी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे. शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×