जीएसबी संयुक्त कोंकणी सभेतर्फे होणार कार्यक्रम
marathinews24.com
पुणे – जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शारदोत्सवानिमित्त रविवार, दि. 28 सप्टेंबर ते गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ येथे होणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.
स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे फेस्टिवल 2025 चे उद्घाटन – सविस्तर बातमी
दि. 28 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भक्तीसुधा या कार्यक्रमात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन, दि. 29 रोजी सकाळी 10 वाजता स्वामी भारतानंद सरस्वती महाराज वारकरी कीर्तन यांचे वारकरी कीर्तन, दि. 29 रोजी सायंकाळी 5:30 स्वरनाद या कार्यक्रमात विनय राव यांचे विविध वाद्य वादन तर सायंकाळी सायंकाळी 6:15 वाजता भक्तीसुमन या कार्यक्रमाअतंर्गत पंडित सुरेश पत्की यांचे गायन होणार आहे.
दि. 30 रोजी सकाळी 10:30 वाजता देवी स्वरांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम एसकेएस श्रीराम भजन मंडळ सादर करणार असून सायंकाळी 6:15 वाजता प्रमदवरा कित्तुर यांच्या शिष्यांचा त्रिदेवी सुक्त हा नृत्याविष्कार सादर होणार आहे.
दि. 1 रोजी सकाळी 10:30 वाजता कु. दिव्या शेणवी मौजेकर कीर्तनसेवा सादर करणार असून सायंकाळी 6:15 वाजता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज श्रीनिवास जोशी यांचा भक्तीतरंग हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 माँ सरस्वती पुर्नउद्भव हा कलरी नाट्यावर आधारित कार्यक्रम राजवर्धन के. आणि सहकारी सादर करणार आहेत. दि. 2 सकाळी 10:30 वाजता बस्ती कविता शेणॉय यांचा भक्तीमंजिरी हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.





















