Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

२७ फेब्रुवारी २०२६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान सोमेश्वर नगर-वाघाळवाडी बारामती येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी येथे सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आळंदी आणि देहू संस्थाना पदाधिकारी आणि प्रशासन बैठक संपन्न – सविस्तर बातमी 

या मेळाव्यामध्ये जिल्हयातील औद्योगिक परिसरातील ३७ नामাकिंत उद्योजकांनी त्यांच्या सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३ हजार ३५ रिक्तपदे भरण्यात येणार आहे. ही सर्व रिक्तपदे किमान १०वी, १२ वी पदवीधर, पदविका अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून बारामती तालुक्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक व बेरोजगार उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी करुन घेण्यासोबतच अर्ज करण्याकरिता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अधिकाधिक नोकरीइच्छूक रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा व या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता गार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×