Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन

महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत एप्रिल २०२६ महिन्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन – सविस्तर बातमी

रोजगार मेळाव्याचे २० एप्रिल रोजी वीर फिरंगोजी नरसाळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दौंड, २१ एप्रिल रोजी मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदापूर, २२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, २३ एप्रिल रोजी शहीद राजगुरु शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड (राजगुरुनगर), ता. खेड आणि २७ एप्रिल रोजी तात्या टोपे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरूर येथे आयोजन करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, पदविका, पदवीधर व पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रिक्त पदे उपलब्ध असणार आहेत. नामांकित उद्योजक या मेळाव्यात सहभागी होणार असून उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांची सविस्तर माहिती व अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in⁠ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मेळाव्यास उपस्थित राहताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व किमान ५ बायोडेटा सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा. बेरोजगार उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेश धर्माधिकारी, कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×