Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन

पुण्यात २५ ऑगस्टला रोजगार मेळावा; १३ उद्योजकांकडून ४११ हून अधिक रिक्त पदांसाठी वॉक-इन मुलाखती

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २५ ऑगस्ट रोजी ६९१, नारायण पेठ, लक्ष्मी रोड, पुणे येथे रोजगार मेळाव्याचे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक संपन्न – सविस्तर बातमी  

या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३ उद्योजकांनी त्यांचा सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ४११ पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. ही सर्व पदे ट्रेनी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ऑपरेशनल वर्क, ट्रेनी एक्झिक्यूटिव्ह, सेल्स अँड मार्केटिंग, कस्टमर सपोर्ट, सेल्स मॅनेजर, उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या मनातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत आल्याने इच्छुक उमेदवारानी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी (Walk-in-Interview) जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा.

उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०- २६१३३६०६, या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×