पुणे गुन्हे शाखेची धुरा पंकज देशमुख यांच्या हाती; तिन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या
marathinews24.com
पुणे – पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले देशमुख यांची नुकतीच पदोन्नतीने पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती. त्यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी ( दि. २०) दिले आहेत.
अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी यापूर्वी पुणे पोलीस दलात वाहतूक शाखेसह परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचा अभ्यास आहे. त्यानंतर त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. शहर पोलीस दलात बदली झालेले राजेश बनसाडे यांची पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बनसोडे यांनीही यापूर्वी पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस दलातून बदलून आलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांची प्रशासन विभागात नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेण्यात प्राधान्य दिले जाणार आहे.