Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pankja Mundhe News : भाऊबीजेला ऊसतोड कामगारांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट; कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील-पंकजा मुंडे

marathinews24.com

पुणे – ऊन-पावसाची तमा न बाळगता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीच्या कामात राबणाऱ्या कामगारांशी आपुलकीचे नाते जपत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मुळशी तालुक्यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. तसेच पालावर चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. त्यांच्या या भेटीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Pankja Mundhe News
Pankja Mundhe News

हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती युवराज काकडे – सविस्तर बातमी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगारासाठी गाव सोडून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा हा प्रसंग कामगारांसाठी आनंददायी ठरला.भाऊबीजेच्या निमित्ताने कामगारांच्यावतीने त्यांना साडीचोळीची ओवाळणी भेट दिली.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, दरवर्षी नेहमी कष्टकारी कामगारांसोबत दिवाळी साजरी करीत असते. काही दिवसांपूर्वी २२ वर्षाचा ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला, हे ऐकून मन सुन्न झाले. ऊसतोड कामगारांचे पाल्यांना शिक्षण, आरोग्यासाठी मदत व्हावी तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे, आपल्या अडीअडचणीबाबत मोकळ्यापणे व्यक्त व्हा, असे सांगून श्रीमती मुंडे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमदार शेळके म्हणाले, सर्व सामान्य कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ताईसाहेब नेहमी उभ्या राहत असतात. ऊसतोड कामगारांच्या पालावर भेट देवून कामगारांसोबत खऱ्याअर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत आहे, असेही श्री. शेळके म्हणाले.

पालावर स्वागताची जय्यत तयारी

मंत्री पंकजा मुंडे पालावर येणार असल्याचे समजताच ऊसतोड कामगारांनी त्यांच्या स्वागताची उत्स्फूर्तपणे तयारी केली होती. पालासमोर सडा टाकून काढलेली रांगोळी, पारंपरिक बंजारा लोकगीते, चिमुकल्यांना नवीन कपडे घालून केलेली सजावट, भोजनाची पूर्वतयारी आणि परिसराची स्वच्छता अशा विविध बाबींचे नियोजन कामगारांनी स्वतः केले होते. त्यांच्या या उत्स्फूर्त स्वागताने पालावर सणासुदीचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष, संचालक, शेतकी अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.

यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात महिलांना साडी भेट दिली.

कुंडलिक बडे, रा. माणेवाडी, जि. अहिल्यानगर : “मंत्री पंकजा मुंडे ताई आपल्या पालावर येणार असल्याचे समजल्यापासून सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुकतेने तयारी केली आहे.”

नवनाथ भोसले, आष्टी, जि. बीड : “पंकजा ताई पालावर येवून ऊसतोड कामगारांसोबत भाऊबीज साजरी केली, फराळ केला, महिलांना साडी चोळीचे वाटप केले आमच्यासाठी आनंददायी आहे.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×