Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

स्वातंत्र्य दिनी पॅरा शूटर निहाल सिंह ठरला गोल्डन बॉय!

एजीसी स्पोर्टस पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस पाचवा

marathinews24.com

पुणे – देशभरात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे भारताच्या पॅरा शूटरांनी अभिमानाची कामगिरी केली. त्यांनी एजीसी स्पोर्टस  पॅरा एडिशन २०२५ ची स्पर्धा गाजवली आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व वाढवले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार – मंत्री उदय सामंत – सविस्तर बातमी

शुक्रवारी बालेवाडी येथे P3 मिक्स्ड २५ मीटर पिस्तूल SH1 प्रकारातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानच्या निहाल सिंह यांनी 28 गुणांसह गोल्ड मेडलवर नाव कोरले, तर हरियाणाच्या राहुल जाखर यांनी 27 गुणांसह रौप्यपदकावर नाव कोरले आणि आर्मीचे आमिर अहमद भट यांनी 25 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

अंतिम सामना अत्यंत चुरशीचा राहिला.अखेरच्या दोन फेऱ्यांपर्यंत निहाल सिंह तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, शेवटच्या फेरीत त्यांनी अप्रतिम नेमबाजी करत आघाडी घेतली आणि 28 गुणांसह सुवर्ण पदकाची कमाई केली. याशिवाय सुरुवातीपासून आम्रीचे आमिर भट प्रथम क्रमांकावर होते. परंतु, स्पर्धेच्या शेवटच्या दोन राऊंडमध्ये त्यांना ही लय कायम राखता आली नाही. त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर यावे लागले आणि निहाल यांनी राहुल यांच्यात गोल्ड मेडलसाठी शर्यत झाली.

त्याचबरोबर या सामन्यात हरियाणाचे मनीष नारवाल (17 गुण) चौथ्या, आर्मीचे धर्मिंदर सिंह (13 गुण) पाचव्या, हरियाणाचे संदीप कुमार (11 गुण) सहाव्या, उत्तर प्रदेशचे आकाश (7 गुण) सातव्या आणि राजस्थानचे राहुल शर्मा (5 गुण) आठव्या स्थानावर राहिले. ११ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल पॅरा शूटर्स सहभागी झाले असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही रोमांचक लढत प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×