Breking News
Shivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

महानगरपालिकेच्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढविल्या जाणार असल्याच्या पक्षश्रेष्ठीच्या सूचना..

महानगरपालिकेच्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढविल्या जाणार असल्याच्या पक्षश्रेष्ठीच्या सूचना..

शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या आणि उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उदघाटन नुकताच पार पडले. या कार्यक्रमाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी आयोजन केले होते.

बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

त्यावेळी डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालकिल्ला आहे. पण कोथरूड आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ तसेच पुण्यातील अनेक भाग शिवसेनेचे बालकिल्ले राहिल्याचे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. *आता येत्या कालावधीत महानगरपालिकेची निवडणुक होणार आहे. त्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढविल्या जाणार असल्याच्या सूचना पक्षश्रेष्ठीच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य शिबिराबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यभरात महायुती सरकाराच्या माध्यमांतून आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात आहे. त्या शिबिराना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्यातून एखाद्या नागरिकांनाला कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास तात्काळ पुढील उपचार दिले जात आहे.जेणेकरून भविष्यातील आरोग्या विषयक धोके टाळणे शक्य होते.त्या दृष्टीने आज कोथरूड विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.या आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा,या निमित्ताने मी सर्वांना एक सांगू इच्छिते की, आपल्या सर्वांच्या पाठीशी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे.तसेच आपल्या सर्वांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या,असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना त्यांनी केले.

यावेळी युवासेना सचिव किरण साळी, सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत, शहरप्रमुख श्रद्धा शिंदे, अनिकेत जावळकर, सुप्रिया पाटेकर, मीनल धनवटे, विराज डाकवे, सुनील काकडे, राजू गोखले, उदय भेलके, लखन तोंडे, शुभम कांबळे, सुनील पासलकर, युवराज शिंगाडे, राजू विटकर, सुधीर जोशी तसेच तज्ञ् डॉक्टर्स उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×