Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

नऱ्हे परिसरात प्रवासी बसला आग

सुदैवाने जीवितहानी टळली

marathinews24.com

पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली. आगीत बस पूर्णपणे जळाली. बसमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

मुंढव्यात हाॅटेल मालक आणि रहिवाशांमध्ये वाद – सविस्तर बातमी

बाह्यवळण मार्गावरुन मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रवासी बस निघाली होती. नऱ्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ धावत्या बसमधून धूर येण्यास सुुरुवात झाली. बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. बसमधील वाहकाने त्वरीत गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. आग लागल्याची माहिती मिळताच बसमधील प्रवासी घाबरले. बसमधील प्रवासी त्वरीत बसमधून बाहेर पडले. बसमधील चालक आणि वाहकाने प्रवाशांनी उतरण्यासाठी मदत केली. बसमधून प्रवासी उतरल्यानंतर बसने पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत बस पूर्णपणे जळाली, तसेच घटनास्थळी मोठा धूर झाला होता. बसमधील प्रवासी त्वरीत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. बसमधील तांत्रिक बिघाड किंवा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×