Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

स्वारगेट परिसरात प्रवाशांकडील ऐवज लंपास

विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या क्रीडा शिक्षकाविरुद्ध गुन्हा

स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – स्वारगेट परिसरात प्रवाशांकडील ऐवज लंपास – स्वारगेट एसटी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी एक लाख दहा हजारांचा ऐवज लांबविला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर- आमदार सिद्धार्थ शिरोळे – सविस्तर बातमी 

स्वारगेट परिसरात पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात राहायला आहेत. त्या स्वारगेट पीएमपी स्थानकात बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले.

दुसऱ्या एका घटनेत स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवाशाकडील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महाडला निघाले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरट्यांनी दोन घटनांमध्ये एक लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. स्वारगेट एसटी स्थानकातील बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. तरुणीला धमकावून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. बलात्कार प्रकरणानंतर स्वारगेट परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. पोलीस बंदाेबस्त आणि सुरक्षाविषयक उपाययोजना केल्यानंतर प्रवाशांकडील दागिने, रोकड, लॅपटाॅप, मोबाइल लांबविण्याचे सुुरु आहे.

मित्रमंडळ चौकात हार्डवेअर दुकानात चोरी

पुणे- पर्वती भागातील मित्रमंडळ चौकात एका हार्डवेअर दुकानाचा दरवजा उचकटून चोरट्यांनी रोकड आणि बॅटरी असा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली. याबाबत व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक हे सहकारनगर भागात राहायला आहेत. त्यांचे पर्वती परिसरातील मित्रमंडळ चाैकात हार्डवेअरचे दुकान आहे.

चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड आणि बॅटरी असा मुद्देमाल लांबविला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. दरम्यान,मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावरील एका गोदामातून चोरट्यांनी मोबाइल संच आणि रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत रखवलदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रखवालदार आणि त्याचा मित्र गोदामात झाेपले होते. चोरट्यांनी गोदामाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. रखवालदार आणि त्याच्या मित्राकडील मोबाइल, तसेच रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×