गुलटेकडी येथे टेम्पोची धडक, पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
marathinews24.com
पुणे – भरधाव टेम्पाे चालकाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुलटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यल्लप्पा अर्जुन पोटे (वय ४२, रा. गंगाराम स्वीटसशेजारी, डायस प्लाॅट, गुलटेकडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा सुमीत पोटे (वय १९) याने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले, पुण्यातील रविवार पेठेतील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे आणि त्यांचा मुलगा सुमीत शनिवारी (२६ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास जेवणाचा डबा आणण्यासाठी गुलटेकडीतील डायस प्लाॅट चौकातून निघाले होते. त्यावेळी शंकरराव डहाणे मार्गावर पोटे थांबले. सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन येतो, असे त्यांनी मुलगा सुमीतला सांगितले. पोटे रस्ता ओलांडून स्वच्छतागृहात निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणारे पोटे यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पोचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.