दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

सेनापती बापट रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती सेनापती बापट रस्त्यावरील एका भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रकाश भवनासमोर ही घटना दोन दिवसांपुर्वी सायंकाळी घडली. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. बाबुलाल बनारसी मौर्य (वय ४६, रा. वडारवाडी, पांडवनगर) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत बाबुलाल यांचा मुलगा रामरूप मौर्य यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

सेफ्टी लोखंडी जाळीचे पाईप अंगावर पडून कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, बाबुलाल हे सायंकाळी साडे सातच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरून पायी चालत जात होते. ते प्रकाश भवनासमोर आल्यानंतर पाठिमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने बाबुलाल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×