Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

खडकवासला धरणाजवळ रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला धरण परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष माधव मते (वय ४७, रा. खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक राेहित दत्तात्रय चव्हाण (रा. खडकवासला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश माधव मते (वय ४५, रा. खडकवासला) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धक्कादायक…विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मते हे १० मे रोजी खडकवासला धरण परिसरातून निघाले हाेते. त्यावेळी भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मते यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मते यांचे भाऊ अविनाश यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक रोहित चव्हाण याने मद्यप्राशन करुन अपघात केल्याचे मते यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र याप्रकरणी अजून वैद्यकीय अहवाल येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×