Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेत

पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेत

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या सूचना

marathinews24.com

पुणे – पिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित २२ कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून पूर्ण करावीत. मिशन मोडवर कामे हाती घेऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा – सविस्तर बातमी 

पुणे नाशिक महामार्गावरील भूसंपादन व वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे तसेच पिंपरी चिंचवड येथील विशेष भूसंपादन अधिकारी, विशेष घटक क्रमांक १ व २, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने डीपी रोडमधील मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठी ३० टक्के रक्कम भरण्याची तरतूद करावी. तसेच भूसंपादन प्रक्रियेसाठी मोजणीची तारीख निश्चित करून सर्व ठिकाणची मोजणी एकाच दिवशी पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे. सर्वांना जमिनी ताब्यात देण्यासाठी देण्यात आलेली वेळेची मर्यादा पाळा. भूसंपादनाशी संबंधित सर्व बाबींचे समन्वयाने नियोजन करून मोजणी करावी. प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन अडथळे तातडीने दूर करावेत, जेणेकरून डीपी रोड मिसिंग लिंकची कामे वेळेत मार्गी लागतील.

महानगरपालिका आणि संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यास पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मोठी मदत होईल, असे लांडगे यांनी सांगितले. बैठकीत मौजे चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, तळवडे, बोराडेवाडी, मोशी, चोवीस, चिखली, वडमुखवाडी येथील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×