Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

शिवाजीनगर वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

शिवाजीनगर वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद 

marathinews24.com

पुणे – पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिवाजीनगर पोलीस वसाहतीत घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. सचिन हरिश्चंद्र सुर्वे (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

सराईत शिवम आंदेकरविरुद्ध खंडणीचा गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्वे खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. ते वसाहतीतील शिवनेरी बिल्डींगमध्ये राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा माहेरी गेले होते. शुक्रवारी दुपारी सुर्वे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली. सुर्वे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×