Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पोलिसांकडून कागदोपत्री पडताळणी; कोणतीही जप्ती नाही नरेश अरोरा

पोलिसांकडून कागदोपत्री पडताळणी; कोणतीही जप्ती नाही नरेश अरोरा

नरेश अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

marathinews24.com

पुणे – आमच्या कार्यालयात नेमके कोणते कामकाज चालते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित कोणती कामे होतात, याबाबत पुणे पोलिसांनी माहिती घेतली. काही कागदपत्रांबाबत विचारणा केली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही कागदपत्रे जप्त केली नाहीत, असे नरेश अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीची झाडाझडती – सविस्तर बातमी 

अरोरा म्हणाले, पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीत नमूद मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंधित व्यक्ती सध्या फोन उचलत नसल्याचे सांगण्यात आले. “आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहोत. चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारत माहिती घेतली. मात्र ते कोणतीही वस्तू किंवा कागदपत्रे घेऊन गेले नाहीत.” अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीवर ते समाधान व्यक्त केले. “मी स्वतः राजकीय व्यक्ती नसून, गेले १० वर्षे मी काम करत असून कधीही चुकीचे काम केलेले नाही. मी नेहमी सकारात्मक आणि कायदेशीर पद्धतीनेच काम करतो,” असेही त्यांनी सांगितले.

“जर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार किंवा पैसे वाटप होत असते, तर पोलिसांना काहीतरी सापडले असते. मात्र तसे काहीही आढळून आलेले नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला. चौकशीसाठी अधिकृतपणे बोलावण्यात आलेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलीस आयुक्तांशी थेट कोणतेही संभाषण झाले नाही, “हे पहिल्यांदाच आमच्याबाबत घडलेले नाही. राजकीय काम करताना अशा प्रकारच्या चौकशा होत राहतात. मात्र सध्या या विषयावर अधिक राजकीय भाष्य करणार नसल्याचेही अरोरा यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×