Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

बारामती मतदारसंघात विविध संकल्पनांवर आधारित मतदान केंद्रे सज्ज

बारामती मतदारसंघात विविध संकल्पनांवर आधारित मतदान केंद्रे सज्ज

निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली माहिती

marathinews24.com

बारामती – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात होणार आहे. यासाठी एकूण ४७८ मतदान केंद्रे आहेत, यापैकी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने विविध संकल्पनांवर आधारित पाच विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

घराण्याचा वारसा मिळाल्याने त्यांना महिला आरक्षणाचे वावडे – सविस्तर बातमी 

यामध्ये केंद्र क्रमांक १२१, मुलींचे शासकीय वसतिगृह, एमआयडीसी येथे ‘पिंक मतदान केंद्र’ तयार करण्यात आले आहे. तसेच केंद्र क्रमांक २६१, राधेश्याम अग्रवाल ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे ‘आदर्श मतदान केंद्र’, केंद्र क्रमांक २२५, जिल्हा परिषद शाळा, पिंपरी येथे ‘युवा मतदान केंद्र’, केंद्र क्रमांक २५८, जिल्हा परिषद शाळा, माळेगाव येथे ‘दिव्यांग मतदान केंद्र’ आणि केंद्र क्रमांक ४७, जिल्हा परिषद शाळा, डोर्लेवाडी येथे ‘युनिक मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहे.

सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीची सोय, महिलांसाठी पाळणाघर तसेच दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन श्री. दिघे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×