Breking News
अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे- पोलिस आयुक्त अमितेश कुमारराज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्यामतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वितपुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणीकौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंडगणना अर्जांच्या डिजिटायझेशनमध्ये राजकीय पक्षांनी सक्रिय भूमिका घ्यावीपुण्यात मिशन क्रॅकडाउनचा गुंडांना तडाखा बसणारह.भ.प. उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते लोणी देवकर एमआयडीसी येथे वृक्षारोपणजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर बारामतीत स्वच्छता मोहीम

बारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

बारामती तालुक्यात अडीच लाखाहून अधिक जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

जनावरांच्या आरोग्यासाठी बारामतीत अडीच लाखांहून अधिक लसीकरण पूर्ण

marathinews24.com

बारामती – तालुक्यात ३ लाख १४ हजार ७२४ पशुधनांपैकी विविध आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने २ लाख ६० हजार ६४४ इतक्या जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित जनावरांचे लसीकरण करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय पोळ यांनी दिली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेत समाविष्ट योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

तालुक्यात (गाय आणि म्हैसवर्ग) एकूण १ लाख ३३ हजार ८३३ मोठी जनावरांपैकी घटसर्प आजाराकरीता २३ हजार १९५, फऱ्या ३ हजार ८२९, लाळखुरकुत १ लाख २५ हजार ५२, लंम्पी ७९ हजार ४३४ इतक्या जनावरांना तसेच एकूण १ लाख ८० हजार ८४१ शेळ्या व मेंढ्या असून त्यापैकी आंत्रविषार या आजाराकरीता २९ हजार १३४ जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे.

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाची साथ येण्याची शक्यता लक्षात घेता नजिकच्या दवाखान्यात आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, पावसाळ्यात आपले जनावरे आजारी पडल्यास शासकीय दवाखान्यात त्वरित संपर्क करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करून घ्यावेत, गोठ्यातील स्वच्छता, निवारा यांचे योग्य नियोजन करावे, संबंधित ग्रामपंचायतीकडून परिसरामध्ये किटकनाशक फवारणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×