Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

राष्ट्रपती ‘गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक जाहीर

पुणे अग्निशमक दल, पोलीस, कारागृह विभागील अधिकारी-कर्मचार्‍याचा पदक जाहीर

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या अग्रिशामक दलाकडील सेवानिवृत्त स्टेशन ड्युटी ऑफिसर सुभाष प्रभाकर जाधव, सेवानिवृत्त फायर इंजिन ड्रायव्हर रामचंद्र तुकाराम गोसावी, फायरमन छगन ताराचंद मोरे यांना राष्ट्रपती ‘गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक’ घोषित झाले आहे. १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस फौजदार संजय दामोदर शिरसाट यांना जाहीर झाले आहे.

शिल्पककार राम सुतार हे महाराष्ट्राचे मानबिंदू- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी

सेवानिवृत्त स्टेशन ड्युटी ऑफिसर सुभाष जाधव हे १९९१ मध्ये फायरमन म्हणून अग्रिशामक दलाच्या सेवेत दाखल झाले होते. यापूर्वी २००४ मध्ये राष्ट्रपती शौर्य पदक ‘ मिळाले आहे. त्यांनी आजपर्यंत दलाच्या सेवेत असताना आग व अपघाताच्या ठिकाणी धाडसी कामगिरीची दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली होती. ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळात २०२१ मध्ये सिरम इंस्टिट्यूट मांजरी आणि फॅशन स्ट्रीट पुणे कॅम्प, सन २०२३ मध्ये वडगाव शेरीतील मल्टीप्लेक्स थिएटर, टिंबर मार्केट, बिबवेवाडीतील आग प्रसंगी संभाव्य वित्तहानी टाळली आहे. एप्रिल २०२५ मध्ये स्टेशन ड्युटी ऑफिसर पदावरून सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्त फायर इंजिन ड्रायव्हर रामचंद्र गोसावी यांनी ३४ वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवा काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. २०१८ मध्ये पाटील इस्टेट झोपडपट्टी, वाकडेवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, २०१९ मध्ये शनिवार पेठ, २०२२ मध्ये वडगाव शेरी मधील सोपान नगर आणि सन २०२३ मध्ये भवानी पेठ टिंबर मार्केटयार्डात लागलेल्या आग विझविताना धाडसी कामगिरी बजावली. तसेच फायरमन छगन ताराचंद मोरे यांनाही विविध आपत्कालीन परिस्थितीत चांगली कामगिरी बजावली आहे. २०१३ मध्ये गुजरात कॉलोनी येथील त्रिमूर्ती हाईटस, कोथरूड येथे लागलेल्या भीषण आगीत नागरिकांची सुटका केली. २०१४ मध्ये विश्रांतवाडी, सन २०२३ मध्ये भवानी पेठेतील आगीवर नियंत्रण मिळविले. २०१६ मध्ये मांडवगण फराटा गावामध्ये कुपनलिकेत पडलेल्या पाच वर्षीय मुलाला सलग ३६ तास प्रयत्न करत बाहेर काढले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×