Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बँकेचे अ‍ॅप बंद पडल्याची बतावणी, जेष्ठाला २ लाखांना घातला गंडा

Crime News : गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष, २८ लाखांचा गंडा

वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसबीआय बँकेचे अ‍ॅप बंद पडले असून, ते सुरू करून देतो अशी बतावणी करत सायबर चोरांनी ज्येष्ठ नागरिकाला २ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १ ऑगस्टला दुपारी बारा ते एकच्या सुमारास वाघोलीतील बकोरी फाटा परिसरात घडली आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय जेष्ठाने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालेय उपक्रमात सर्वोत्तम असलेल्या जिल्ह्यांना मिळणार कोटींची पारितोषिके- शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीत राहायला असून, १ ऑगस्टला दुपारी बाराच्या सुमारास सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. एसबीआय बँकेचे अ‍ॅप बंद पडल्याची बतावणी केली. ज्येष्ठाने अ‍ॅप बघितले असता त्यांना बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना बँकेचे अ‍ॅप पुन्हा सुरू करून देतो, अशी बतावणी केली. त्यांच्या मोबाइलवर ऑनलाईनरित्या एक ओटीपी पाठवला. ज्येष्ठाने सायबर चोरांना ओटीपी सांगताच त्यांच्या बँक खात्यातून २ लाख रुपये कमी झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठाने वाघोली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर राघू तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×