कोंढवा, आंबेगाव भागात सदनिकेतून ऐवज चोरीला

कोंढवा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंंढवा, आंबेगाव भागात चोरट्यांनी सदनिकेतून ३ लाख ३४ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ, तसेच कोंढवा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मोक्का’ कारवाईनंतर पसार झालेल्या सराइताला अटक – सविस्तर बातमी

धनकवडीतील आंबेगाव पठार भागात सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आंबेगाव पठार भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून चोरट्यांनी दोन लाख १३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. पोलीस हवालदार गोरे तपास करत आहेत.

कोंढवा भागात एका सदनिकेतून चोरट्यांनी एक लाख २१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुखसागरनगर परिसरात राहायला आहेत. ८ डिसेंबर रोजी तक्रारदार दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यांनी सदनिकेची चावी दरवाज्याजवळ असलेल्या जागेत लपवून ठेवली. चोरट्यांनी चावीचा वापर करुन दरवाजा उघडला. कपाटातील एक लाख २१ हजार रुपयांचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. तक्रारदाराच्या घरातून ऐवज चोरणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×