२ लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास; तीन घरफोड्यांची मालिका
Marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करून २ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी खडक आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले पेठ येथील सारिका सुसगोहरे (वय ४७) यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार ३ ते ४ एप्रिल दरम्यान घडला.
पोलिस उपनिरीक्षक पडवळे करत आहेत.
चोरट्यानी अंगद शिंदे (३२, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, आंबेगाव बु.) यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार ३ ते ४ एप्रिल दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत. तर, तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी गणेश सुरवसे (२९, रा. शेलार मळा, महादेव नगर,
कात्रज) यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ५ ते ६ मार्च या कालावधीत घडली होती. याप्रकरणी ४ एप्रिलला फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोकाशी करत आहेत.