Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज लांबविला

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोथरूड भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिक्कीमधील कंपनीच्या नावे बनावट औषधांची विक्रीचा प्रकार उघड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कोथरूडमधील उजवी भुसारी काॅलनीतील एका सोसायटीत राहायला आहेत. ८ डिसेंबर रोजी त्या नातेवाईकांसोबत त्या पर्यटनासाठी गोव्यात गेल्या होत्या. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून शयनगृाहातील सात लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. ज्येष्ठ महिला गोव्याहून परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाेलिसांनी ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरात असललेल्या एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटुंबीयांसोबत परवागी विवाह समारंभासाठी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेतील गच्चीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×