Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडला

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडला

जागेच्या भाड्यावरून पेच

marathinews24.com

पुणे – पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारतीचे कामकाज सुरू झाले आहे. तात्पुरत्या स्वरुपात मंगळवार पेठेतील जुन्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या ‘अंतरिक्ष टाॅवर्स’ इमारतीतून पोलीस आयुक्यालयाचे कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव रखडला आहे. जागेच्या भाड्यावरून हा पेच निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने मध्यस्थी करण्याची मागणी होत आहे.

राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले. पोलीस आयुक्तालयातील मुख्य इमारती वगळता आवारातील गुन्हे शाखेची कार्यालये पाडण्यात आली आहेत. नवीन इमारतीसाठी पाया खोदला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येत आहे. इमारत बांधणीचे काम प्रसिद्ध बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. दोन वर्षांत पोलीस आयुक्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

पोलिस आयुक्तालयाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात मंगळवार पेठेतील ‘अंतरिक्ष’ टॉवरमधून सुरू करण्याच्या प्रस्ताव विचाराधीन आहे. भाड्यावरून पेच निर्माण झाल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. संबंधित जागा मालकाने ८४ रुपये प्रतिचौरस फूट दराने जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, सरकारी नियमानुसार कमाल ८० रुपये दर देणे शक्य होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

नवीन जागेत पोलीस आयुक्यालयाचे स्थलांतर केल्यास दरमहा २० ते २५ लाख रुपये भाडे माेजावे लागणार आहे. कार्यालय सुरू करण्यापूर्वी तेथे पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, तसेच प्रशासकीय विभागातील कार्यालयांचे स्थलांतर करणे शक्य होणार आहे. ‘अंतरिक्ष टाॅवर्स’ची जागा स्थलांतरासाठी योग्य आहे. मात्र, भाडेदरामुळे स्थलांतराचा प्रस्ताव रखडला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस भरतीवरूनही पेच

पुणे शहरात आणखी पाच नवीन पोलीस ठाणी पोलीस सुरू करण्याचा प्रस्ताव गृह विभागाने नुकताच मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा पुण्यात केली होती. पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन अतिरिक्त १ हजार पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया काही कारणास्तव रखडली. नवीन भरती प्रक्रियेतून अतिरिक्त मनुष्यबळ पुणे पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन पोलीस ठाणी, तसेच शहराचा विस्तार विचारात घेता एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायला हवे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×