Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

ब्युटी पार्लरमध्ये कामाच्या आमिषाने तरुणींकडून वेश्याव्यवसाय

खराडीत मसाज पार्लरच्या नाावाखाली वेश्याव्यवसाय

भारती विद्यापीठ पोलिसांकडून दलाल अटकेत

marathinews24.com

पुणे – ब्युटी पार्लरमध्ये काम लावण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालहून पुण्यात आणून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दलालाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पश्चिम बंगालमधी दोन तरुणींची सुटका केली. दोन वर्ष छळ सहन केल्यानंतर संधी मिळाल्यावर तरुणींनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली.

कुख्यात गुंड नीलेश घायवळचा साथीदाविरुद्ध मोक्का – सविस्तर बातमी

राजू चिद्रवार-पाटील (वय २५, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मीरा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती पसार झाला आहे. याबाबत २२ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू चिद्रवार आणि त्याची पत्नी मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम लावून देते, असे आमिष दाखविले. दोघींना पश्चिम बंगालमधील गावाहून पुण्यात आले. ब्युटी पार्लरमध्ये कामाला न लावता तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. दोघींनी नकार दिल्यानंतर त्यांना डांबून ठेवले. त्यांना धमकावून शिवीगाळ केली. मारहाण करुन छळ केला, तसेच त्यांना उपाशी ठेवले. दोघींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करुन त्यांच्याकडून आरोपी पैसे घेत होते.

गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार भागात तरुणीला त्यांनी आणले. तिलाही वेश्याव्यवसायास प्रवृत्त केली. तरुणीने संधी साधून मोबाइल क्रमांकावरुन पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाला तरुणीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी छापा टाकून आरोपी चिद्रवारच्या ताब्यातून फिर्यादी तरुणीसह दोघींची सुटका केली. पोलीस निरीक्षक खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×